ताज्या घडामोडीमराठवाडा

Beed crime-court- *विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळ व मारहाण प्रकरणातील तीन आरोपीची निर्दोष मुक्तता*

शेअर करा

बीड दि.27 फेब्रुवारी ।टीम सीएमन्यूज

Advertisement

वांगी ता.जि.बीड येथील विवाहित महिलेस दारुसाठी माहेरहुन पाच हजार रुपये का आणत नाहीस म्हणून शारीरिक व मानसिक छळ करुन तिला मारहाण करुन घरातुन हाकलुन दिल्याच्या प्रकरणातुन तीन आरोपींची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब बीड यांनी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , दि 13/10/2015 रोजी वांगी ता .जि बीड येथील विवाहित महिला नामे सुषमा विष्णू शेळके हीने ग्रामीण पोलीस स्टेशन बीड येथे फिर्याद दिली की,तिचे लग्न 8 वर्षापूर्वी विष्णू शेळके यांच्या बरोबर झाले होते . लग्न झाल्यानंतर सुरुवातीला दोन वर्षे तिला सासरकडील लोंकानी चांगले नांदविले . दरम्यान तिला एक मुलगी झाली व नंतर नवरा , सासरा व सासु तिला वडीलांकडून दरमहा पाच हजार रूपये नव-याला दारुसाठी घेऊन येत जा म्हणून माहेरी पाठविले ,काही वेळेस तिच्या हट्टामूळे तिच्या वडीलांनी पैसे दिले परंतु काही दिवसांनी तिच्या वडीलांनी पैसे देणे बंद केल्यावर सासरकडील लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करु लागले . आरोपी यांनी तिला मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिले व तु जर पैसे नाही आणले तर तुला आम्ही जीवे मारुन टाकु असे म्हणून तिला लाथाबुक्यांनी मारहान व शिवीगाळ केली. त्यानंतर तिने सासरकडील लोकांविरुध्द महिला तक्रार निवारण मंचात तक्रार दिली परंतु सासरकडील तेथे हजर झाले नाहीत अशी फिर्याद दिली सदर फिर्यादीवरून विष्णू शेळके,लहु शेळके,शोभा शेळके सर्व रा. वांगी यांच्या विरुद्ध कलम 498-अ 323,504, 506,सह 34 भा.द. वि प्रमाणे गुन्हा नोंद झाला .सदर प्रकरणात तपासाअंती वरील कलमा अन्वये मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
सदर प्रकरणात आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्षाने महत्त्वाचे साक्षीदार तपासले.परंतु कोणत्याही साक्षीदाराची साक्ष आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करू शकली नाही व आरोपीचे वकील अॅड. सचिन अ . आबुज यांनी घेतलेलला बचाव व सबळ पुराव्या अभावी सर्व तीन आरोपीना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.बी. डोमाळे साहेब यांनी दि .26/2/2020 रोजी निर्दोष मुक्त केले.
सदर प्रकरणात सर्व तीन आरोपीचा वतीने बीड येथील अॅड सचिन अ.आबूज यांनी काम पहिले .सदर प्रकरणात त्याना अॅड विशाखा व्ही जाधव यांनी सहकार्य केले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: