ताज्या घडामोडी

*बीड जिल्ह्याला कोरोनाचा धक्का;सहा बाधित*

मृताचा समावेश

शेअर करा

बीड दि, 8 जून टीम सीएमन्यूज

गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना आज नव्याने सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असुन त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे .मृत हा आष्टी तालुक्यातील मातावळी येथील आहे .

आज तपासणी साठी 22 स्वॅब पाठविण्यात आले होते त्यापैकी 15 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर 6 अहवाल हे पॉझिटिव्ह आले असुन एक इनकनक्लूझिव्ह आहे .
बाधित रुग्णांमध्ये आंबेवडगाव ता. धारूर येथील 10 वर्षे वयाचा मुलगा आहे .मालेगाव बुद्रूक ता. गेवराई येथे ठाणे येथून आलेली 18 वर्षे वयाची युवती आहे. बीड शहरातील
मसरत नगर येथे 3 बाधित आढळून आले हे सर्व हैदराबादहून आलेले आहेत.तर जिल्हा रुग्णालयात मृत झालेल्या मातावळी ता.आष्टी येथील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close