ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यातील हे गावे कंटेन्मेंट झोन जाहीर*

शेअर करा

 

बीड दि 21 मे टीम सीएम न्यूज

Advertisement

बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या वाढतेय .दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे .काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात चार नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे
हे रुग्ण पाटोदा तालुक्यात तीन आणि वडवणी शहरात एक आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या ठिकाणचे कंटेनमेंट झोन जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण पाटोदा शहर आता कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. तर, पाटोदा तालुक्यातील वहाली येथेही कोरोनाग्रस्त आढळल्याने वहाली, सावरगाव घाट, निवडुंगा, वागदरा वस्ती, सप्रे वस्ती या पाच गावांचा परिसर कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आला.

अधिक वाचा
*बीड जिल्ह्यात 4 नवीन कोरोना बाधितांची भर,कोरोना गावात पसरतोय* https://cmnews.co.in/4-new-corona-cases-in-beed-district-spreading-in-corona-village/

वडवणी शहरातील साळींबा रोडवरील कोर्टासमोरील इमारत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. तर या इमारती सभोवतालचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. वरील सर्व गावे आणि परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: