क्रीडा शिक्षण संकृतीताज्या घडामोडीशैक्षणिक

*बीडच्या शिक्षणाधिकारी(माध्य)पदाची माळ कोणाच्या गळ्यात?अजित कुंभार यांच्यासमोर यक्षप्रश्न*

बीड जिल्ह्याचा शिक्षण विभागाचे कामच प्रभारीवर

शेअर करा

 

 

बीड दि, २ मे टीम सीएम न्यूज

 

बीड जिल्हा परिषदेतील बर्ग दोनच्या अधिकारी असलेल्या आणि वर्ग एकच्या पदावर प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणून काम करणाऱ्या नजमा उस्मानी ३१ मे ला सेवानिवृत्त झाल्यानतर हे पद सध्या रिक्त असून या प्रभारी पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत शिक्षण विभागात औत्युक्य आहे.तर हे पद कोणाकडे द्यायचे असा प्रश्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची वानवा आहे. गेल्या अनेक वर्षापासून या विभागात पदाचे अधिकारी नाहीत. या विभागात शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक असे वर्ग १ ची दोन पदे आहेत, मात्र यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी  पदाचा पदभार वर्ग२ चे शालेय पोषण आहार अधिकारी अजय बहीर यांना देण्यात आला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा  पदभार असलेल्या नजमा उस्मानी या सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यामुळे हे पद सध्या रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदाचा पदभार कोणाला मिळतो याकडे शिक्षण विभागाचे डोळे आहेत.

बीड जिल्ह्यातील १० तालुक्यातील शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार विस्तार अधिकाऱ्यांकडे आहे. वडवणी येथे पदाच्या गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यात सध्या शिक्षण विभागात दोनच वर्ग-२ चे अधिकारी आहेत कार्यरत असून अजय बहीर यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज आहे. दुसऱ्या महिला अधिकारी असून त्या वडवणीच्या गटशिक्षणाधिकारी आहेत. जिल्ह्यातील शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी हे पद वर्ग-२ च्या पदाचे असते मात्र त्यासाठी एकही अधिकारी नाही. या पदाचा पदभार वर्ग-३ चे विस्तार अधिकारी चालवत आहेत. त्यामुळे बीड शिक्षण विभागात पदांच्या अधिकाऱ्यांची वानवा आहे. सध्या तरी माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद वाऱ्यावरच आहे.

जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभार हा चार्जवर सुरु असून पदाचे अधिकारी जिल्ह्याला केव्हा मिळणार हा प्रश्न आहे. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close