क्राईमब्रेकिंग न्यूजमराठवाडा आणि विदर्भ

*अत्यावश्यक सेवेचे पास आता जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणार*

शेअर करा

 

बीड दि,4 मे टीम सीएमन्यूज

संचार बंदीच्या काळात बीड जिल्ह्यात देण्यात येणाऱ्या पासची व्यवस्था आता बदलण्यात आली आहे पास हे आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली.
यापूर्वी हे सर्व पास बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देण्यात येत होते.
बीड अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी आणि बाहेरच्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना किंवा बाहेरच्या राज्यात नागरिकांना बीड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रक्रिया राबवली जाणार आहे.

त्यासाठी www.beed.gov.in
ही वेबसाईट देण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्रीकांत निळे (मोबाईल क्रमांक 9552463277)त्याचे काम पाहणार आहेत.
अत्यावश्यक सेवेसाठी किंवा अर्जंट वैद्यकीय कारणासाठी जिल्ह्यात किंवा जिल्हा बाहेर जाणाऱ्या व्यक्तीसाठी मिळणाऱ्या पास संबंधीचे कामकाज नायब तहसीलदार धर्माधिकारी ( मो क्रमांक 9371547217) आणि नायब तहसीलदार रत्नपारखी (मो क्रमांक 9422745532) हे पाहणार आहेत.

नागरिकांनी संबंधित वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरण्याचे आवाहन कबाडे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close