ताज्या घडामोडीमराठवाडा

Beed-mahila din- *जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यार्थीनीना वाटल्या मोफत सायकली*

शेअर करा

 

o

आष्टी दि.7 मार्च ।टीम सीएमन्यूज

  • आष्टी तालुक्यातील  डोंगरगण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिवाजी परसराम कोल्हे यांनी महिला दिनाच्या औचित्य साधून आणि आपल्या मुलाच्या लग्नातील खर्च टाळून शाळेतील विद्यार्थिनींना आज सायकलींचे वाटप केले .
    कोल्हे यांच्या शाळेतील मुलींना शाळेत येण्यासाठी पायपीट करावी लागते .महिला दिनाच्या दिवशी त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा आहे .या लग्न सोहळ्यातील वरतीचा खर्च कमी करून त्यांनी तो आपल्या शाळेतील मुलांच्या सायकलीवर केला आहे .त्यांच्या मुलाचा विवाह 8 मार्च रोजी होत आहे.
    लग्नाचे व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लग्नानंतर संध्याकाळी होणारा वरात हा कार्यक्रम वगळून त्या होणाऱ्या खर्चात कोल्हे सर यांनी जि प प्रा शा डोंगरगण येथील वस्तीवरून येणाऱ्या 10 विध्यार्थीनींना मोफत सायकलचे वाटप केले त्याबद्दल त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: