ताज्या घडामोडीमराठवाडा

Beed-majalgaon-court *विवाहीतेवर बलात्कार प्रकरणी तीन आरोपीस सात वर्षे सक्त मजुरी*

शेअर करा

 

बीड दि 27 । टीम सीएमन्यूज

Advertisement

माजलगाव तालुक्यातील विवाहीतेवर तिघांनी बलात्कार केल्याप्रकरणी माजलगांव येथील अप्पर सत्र न्यायालयाने तिघांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली .

वडवणी तालुक्यातील एका विवाहित महिलेवर रात्री उशिरा तिचा पती बाहेर गेल्यानंतर
आरोपी नवनाथ नामदेव राठोड, वय २७ वर्षे , नागोराव रामा राठोड वय ३५ वर्षे, बाळू शामराव राठोड, वय १९ वर्षे सर्व रा. बिचकुलदरा तांडा ता. वडवणी जि. बीड यांनी तोंड दाबून महिलेवर बलात्कार केला त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली . या सर्व प्रकारानंतर महिलेने आपल्या पतीसह पोलिसात फिर्याद दाखल केली होती . या सर्व प्रकरणाचा तपास पोलिसांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले .या प्रकरणी कलम ३७६,४५२,५०६ सह कलम १०९ अ, भा.द. वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर आरोपीविरुष्द माजलगांव येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले प्रस्तुत प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ०७ साक्षीदार तपासण्यात आले. यामधील फिर्याँदीची साक्ष व तपासी अधीकारी एस.आर.साबळे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन अरविंद. एस. वाघमारे, अप्पर सत्र न्यायाधीश माजलगांव-१ यांनी आरोपी यास वडवणी पो.स्टे. गु.र.नं ८०/१४ कायद्याचे कलम ३७६,४५२,५०६सह कलम १०९ भा.द.बी प्रमाणे दोषी घरून आरोपी क. १ नवनाथ यास भादविचे कलम ३७६ नुसार सात वर्षे सश्रम कारावास व ३०००/- रूपये दंड दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद, कलम ४५२ खाली तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २०००/- रू. दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, आरोपी क. २ व ३ नागोराव व बाळू यांना आरोपी क. १ यास प्रोत्साहन व मदत केल्यावरून कलम ३७६ सह कलम १०९ नुसार सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ३०००/- रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैदेवी शिक्षा ठोठावली. .

 

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने वरिष्ठ सहायक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले व त्यांना सरकारी वकील आर.ए..वाघमारे, पैरवी अधीकारी जे.एस. वाव्हळकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: