ताज्या घडामोडीमराठवाडा

*बीड जिल्ह्यात आज कुठे किती वाढले कोरोना बाधित रुग्ण!*

शेअर करा

 

 

बीड दि १६ ऑक्टोबर,प्रतिनिधी

 

बीड जिल्ह्यातील कोरोना CORONA बाधितांचा आकडा वाढत आहे. दररोज ही संख्या शंभरहून अधिक येत आहे. आज दुपारी आलेल्या अहवालात १२१  कोरोना बाधित आढळून आले आहेत.

हेही वाचा :आठवडी बाजार सुरु, शाळा अजूनही बंदच 

बीड जिल्ह्यातील ६४७ रुग्णांचा कोरोना CORONA अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये १२१ रुग्ण  कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर ५२६ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी ०३, कडा ०२,पिंपळा ०२ ,आनंदवाडी ०२,कर्हेवडगाव ०२ आष्टी ०२ करंजी ०१ असे एकूण १४ बाधित आढळून आले आहेत.

अंबाजोगाई १० , आष्टी १४, बीड ४०  ,धारूर १२ गेवराई ०८  केज ०४ ,माजलगाव १० परळी ०२ पाटोदा ०८  शिरूर कासार १० वडवणी ०३ असे एकूण १२१ रुग्ण कोरोना CORONA बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक आकडा हा बीड  तालुक्याचा आहे.ही संख्या कमी होताना दिसत नाही.

राज्यात अनलॉक सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागात हि संख्या वाढत आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close