ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमराठवाडा

पुन्हा एकदा महिलेवर बिबट्याचा हल्ला ;महिला बालंबाल वाचली

शेअर करा

 

पुन्हा एकदा महिलेवर बिबट्याचा हल्ला ;महिला बालंबाल वाचली

आष्टी दि 28 प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले वाढत असून आज सायंकाळी पुन्हा आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.सोबत असलेल्या मुलाच्या प्रसंगावधाना मूळे महिला बालंबाल बचावली.आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला.

आष्टी तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढत असून सर्वच ठिकाणी हल्ले होत आहेत.आज दुपारी मंगरूळ येथील शिलावती दत्ताञय दिंडे आणि त्यांचा मुलगा अभिषेक दिंडे हे आपल्या शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला केला.यामध्ये ती जखमी झाली .यावेळी जवळच असलेल्या मुलाने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली.आईवरचा हल्ला मुलामुळे परतून लावता आला.
मुलावर कोणत्याही हल्ला झाला नाही.

या महिलेने शेतात असताना अंगावर स्वेटर आणि गळ्याभोवती गुंडाळले असल्याने ही महिला बिबट्याच्या तावडीतून सुटली असल्याचे आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांनी सांगितले.हा बिबट्याने अपेक्षेपेक्षा जास्त अंतर कापले असून किन्ही पासून हे अंतर 10 किमी पेक्षा जास्त आहे.कोणताही बिबट्या हल्ला करत नसून माणसावर हल्ला करणारा एखादाच असू शकतो असेही त्यांनी सांगितले.

बिबट्याने हल्ला केल्यानंतर या महिलेच्या मांडीवर आणि उजव्या हाताला चावा घेण्याचा प्रयत्न बिबट्याने केला.सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही . ही महिला बिबट्याच्या हल्ल्यात बालंबाल बचावली .

हेही वाचा:भय इथले संपत नाही;माणसं होतायत बिबट्याची शिकार

या आई आणि मुलाचे नाव असून हे मायलेक गावातील शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना बिबट्याने महिलेवर हल्ला केला माञ अभिषेकने प्रसंंगावधान राखून आरडाओरडा केल्याने बिबट्याने घटनास्थळावरुन धूम ठोकली.महिलेच्या हाताला व इतरञ बिबट्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला माञ सुदैवाने गंभीर इजा झाली नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close