ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Beed-vida- *गाढवावरून गावात वाजतगाजत काढली जावयाची मिरवणूक*

शेअर करा

विडा दि.10 मार्च । टीमसीएम न्यूज

केज तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाच्या दिवशी जावयास गाढवावरून मिरवण्याची गेल्या ९० वर्षांपासूनची परंपरा असून या वर्षीच्या धुलीवंदनाच्या दिवशी मस्साजोग येथील रहिवासी असलेले विडा येथील बाबासाहेब पवार यांचे जावई दत्तात्रय गायकवाड हे या वर्षीचे मानकरी ठरले.

मंगळवारी सकाळी त्यांना मस्साजोग येथे विडा ग्रामस्थानी पकडल्या नंतर त्यांची मोठ्या जल्होउत्साहात गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली

गेल्या ९० वर्षा पूर्वी विडा येथे धुळवडीच्या दिवशी चेष्टा मस्करीतुन गावचे ठाकूर यांनी त्यांच्या जावायाची गाढवावरून वाजत गाजत मिरवणूक काढली होती चेष्टा मस्करीतून आनंद ठाकूर यांनी काढलेली जावयाची मिरवणूक त्या नंतर गावची परंपरा बनली ती आजही कायम चालू आहे.
विडा गावात शंभरच्या वर घर जावई आहेत मात्र ते धुलीवंदनाच्या एक दिन दिवस अगोदर गावातून भूमिगत होतात त्यामुळे ग्रामस्थांना जावई शोध मोहीम राबवून जावयास शोधून आणून गावात गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात.
यावर्षी विडा येथील बाबासाहेब पवार यांचे जावई मस्साजोग येथील रहिवासी असलेले दत्तात्रय गायकवाड याना उत्सव समितीच्या कमिटी मधील शहाजी गुटे ,उपसरपंच बी आर देशमुख ,लहू घोरपडे ,सुरज पटाईत अविनाश सिरसाट ,गोविंद देशमुख यांनी मस्साजोग येथे सकाळी सात वाजता पकडले व गावात गाढव मिरवणुकीसाठी आणले ,त्यांना गाढवावर बसवून ग्रामपंचायत कार्यालया पासून मिरवणूकीला वाजतगाजत सुरवात करण्यात आली.
गाढवावरील जावायाची मिरवणूक गावात मिरवल्या नंतर मिरवणुकीचा शेवट सकाळी साडे अकरा वाजता हनुमान मंदीरा जवळ करण्यात आला यावेळी जावाई दत्तात्रय गायकवाड यांना उत्सव समितीतर्फे गावचे सरपंच भैरवनाथ काळे ,पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांच्या हस्ते कपड्याचा आहेर करत सन्मानित केले हि मिरवणूक पाहण्यासाठी गावातील महिला पुरुषांसह युवकांनी मोठी गर्दी केली होती.

गावात आले आणि सापडले

विडा येथील गदर्भ मिरवणुकीपासून वाचण्यासाठी दत्तात्रय गायकवाड हे दोन दिवस शेतात मुक्कामी थांबले होते मात्र धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी सात वाजता ते मस्साजोग बस स्थानकावर आले असता त्यांना उत्सव समितीच्या पदाधिकारी यांनी पकडून त्यांना विडा येथे जीप मधून आणून त्यांची गदर्भ मिरवणूक काढली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close