fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडामुंबई

*बेस्टचा कोरोना गावागावात पोहोचला;एसटीचे कर्मचारी होताहेत बाधित*

शेअर करा

 

बीड दि,17 प्रतिनिधी

बेस्ट या मुंबईतील उपक्रमासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून एसटी आगारातील चालक आणि वाहक यांना मुंबई येथे ड्युटी साठी पाठवले जात आहे. याचा परिणाम म्हणून येतानाही चालक आणि वाहक कोरोना वाहक बनून येत असल्याचे चित्र आज आलेल्या अहवालातून दिसत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये आज एकूण 108 पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यापैकी माजलगाव एसटी डेपो मधील सहा कर्मचारी , गेवराई एसटी डेपोतील बारा कर्मचारी आणि बीड एसटी डेपो मधील एक कर्मचारी अशा एकूण 19 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.हे बेस्ट उपक्रमासाठी मुंबईला गेले होते.

कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असून हा रेट जिल्ह्याच्या पॉझिटिव्ह रेट च्या तुलनेत तीन पॉईंट पंधरा टक्के इतका झाला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये आंबेजोगाई 15 आष्टी 10 बीड 26 धारूर 3 गेवराई 18 केज 5 माजलगाव 13 परळी 8 पाटोदा 7आणि वडवणी 3 अशा एकूण 108 रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा:मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला दुसऱ्या धक्का;रमेश पोकळे यांची बंडखोरी

बीड जिल्हा प्रशासनाला आज 708 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी सहाशे रुग्णांचे अहवाल हे निगेटिव आले तर 108 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आष्टी तालुक्यातील खडकत येथील दोन ,कडा येथील एक, पारगाव जोगेश्वरी येथील दोन,सोलेवाडी येथील एक, आष्टी येथील एक, निमगाव बोडखा एक, कोयाळ एक, खिळद एक अशा एकूण दहा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा समावेश आहे.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close