ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

*भंडारदरा भरले;विसर्ग सुरू*

शेअर करा

 

 

भंडारदरा दि 16 ,प्रतिनिधी
संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन असलेले भंडारादरा धरण रविवारी सकाळी काठोकाठ भरले असुन या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये असलेल्या शेतक-यांना आनंद झाला असल्याचे दिसत आहे. भंडारदरा धरणाच्या ओव्हर फ्लो गेटमधुन रविवारी सकाळी सहा वाजता पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेले भंडारादरा धरण कधी भरते याची उत्सुकता धरण लाभक्षेत्रातील नागरीकांना लागली होती. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता भंडारादरा धरण काठोकाठ भरले असल्याचे दिसुन आले. भंडारदरा धरण शाखेने तांत्रिक दृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर केले नसले तरी भंडारादरा धरणाचा पाणीसाठा रविवारी सकाळी सहा वाजता 10366 दलघफुटावर पोहचला होता. धरणाच्या स्पिल वे मधुन 2436 क्युसेक्सने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे तर विद्युत निर्माण केंद्रातून 832 क्युसेक्सने पाणी वाहते आहे. यावर्षी भंडारादरा धरणाच्या पाणलोटात पावसाने फारच उशिरा आगमण केल्याने भंडारादरा धरण भरते किंवा नाही याची साशंकता होती. पंरतु गत आठवड्यापासुन भंडारादरा पाणलोटात ढगफुटीसारखा पाऊस पडला व अखेर रविवारी धरण काठोकाठ भरल्याचे दिसुन येत होते. 11039 दलघफु क्षमतेचे असलेले ब्रिटीशकालीन भंडारादरा धरण असुन या धरणावर अहमदनगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतीला पाणी खेळते. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतक-यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी धरणाच्या पाणलोटात पुन्हा एकदा पावसाने कहर करत संपुर्ण आदिवासी भाग झोडपला असल्याने या शेतकरी बांधवांची भात शेती पाण्याखाली बुडाली आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close