ताज्या घडामोडीमराठवाडा

*पैगंबर जयंती निमित्त 102 रक्तदात्यांनी केले रक्तदान यामध्ये प्लाझ्मा दात्यांचा समावेश*

सिरत कमेटी, आधार फाउंडेशन व शाहीन बाग यांचा स्तुत्य उपक्रम

शेअर करा

 

आष्टी दि 30 प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले सिरत कमेटी व आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत यंदाच्या वर्षीही मुस्लिम धर्माचे अखेरचे पैगंबर मोहम्मद यांच्या जयंती निमित्त आष्टीच्या ईदगाह मैदान येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये एकूण 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.यामध्ये प्लाझ्मा दात्यांचा समावेश आहे.
शुक्रवार दि 30 ऑक्टोबर रोजी ईदगाह मैदान येथे सिरत कमेटी, शाहीन बाग व आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पैगंबर जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आष्टी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विलास सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना महामारीत अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना रोगाच्या उपचारासाठी रक्त व प्लाजमा आवश्यक आहे. यातच रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याने दरवर्षी प्रमाणे दि. 30 ऑक्टोबर रोजी पैगंबर जयंती निमित्त अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर व विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर येथील आनंदऋषी रक्तपेढी यांना आमंत्रित करून सदरील रक्तदान शिबीर घेण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे यश बाळासाहेब आजबे, रवी शेठ मेहेर, संदिप अस्वर, शफी सय्यद, रजीउल्ला बेग, शार्दूल जोशी पत्रकार जावेद पठाण, अविशांत कुमकर, गणेश दळवी, अण्णासाहेब साबळे व आनंदऋषी रक्तपेढीचे डॉ. सुनील महारनोर, डॉ, आकाश गायकड, संदीप पानसरे, संदीप भोसले, डॉ. मोरे शंकर, पालवे सुरेखा, शेख निशात तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नदीम शेख, नाजीम शेख, पत्रकार मुजाहिद सय्यद, मुन्ना शेख, adv. फहीम शेख, अजहर शेख, अजीम शेख, अरबाज बेग, वाजेद खान, आमीर सय्यद, शायबाज सय्यद, वाहेद सय्यद, फेरोज पठाण आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा:नगर वन विभागाच्या मदतीला जळगाव, यावल आणि नाशिक येथील पथक*

13 महिला तर 8 प्लामा डोनर

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 102 रक्तदात्यांपैकी तेरा महिलांनी रक्तदान तर केले आठ प्लाझ्मा डोनर यांनी सहभाग नोंदवला होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close