fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*पिकअप आणि ट्रकच्या समोरासमोर धडकेत दोघे गंभीर जखमी*

शेअर करा

 

कडा दि 24 प्रतिनिधी

Advertisement

कडा नगर रस्त्यावर साबलखेड नजीक
ट्रक आणि पिकअप मध्ये झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली.

कडा नगर रस्त्यावर साबलखेड जवळ येथे पहाटे एक वाजण्याच्या  सुमारास पिकअप व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली यामध्ये दोन जण गंभीर जखमी तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक व त्यांच्या सोबत असणार्‍या सहकारी यांनी पिकअपमधील जखमी यांना कॅबिनमध्ये अडकलेल्या जखमीना सुखरुप बाहेर काढले.अंभोरा पोलीसांना झालेल्या घटनेची माहीती दिली तो पर्यंत साबलखेड येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. अंभोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमीना जवळच्या दवाखान्यामध्ये उपचार्थी दाखल केले.

विकास तागड हे पिकअप (एम एच १६ सी सी २२२६) घेऊन  जामखेडहुन अहमदनगर कडे जात होते तर मोहम्मद दस्तगीर सय्यद हे ट्रक (एपी-१३ एक्स ६७२५) घेऊन वापी (गुजरात) येथून हैद्राबाद कडे जात होते.  दोन्ही वाहने साबलखेड (ता.आष्टी) येथे पहाटे एक वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये पिकअपचे चालक विकास तागड व प्रशांत मांडगे हे गंभीर जखमी झाले तर ट्रकचालक मोहम्मद दस्तगीर सय्यद व अन्य एक किरकोळ जखमी झाले आहेत.दुपारपर्यंत ही दोन्ही वाहने रस्त्यावर उभी होती .दोन्ही वाहनांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा:ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या अज्ञातांनी लावली आग;पुन्हा जाळपोळ

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close