ताज्या घडामोडीमराठवाडा

वळणावर झालेल्या अपघातात तलाठी गोरे यांचा मृत्यू

शेअर करा

 

 

कडा दि 19 डिसेंबर,प्रतिनिधी

कड्यातून शेरी कडे जात असताना वळणावर गाडीवरील ताबा सुटला.आणि गाडीने दोन पलटी खाल्ल्याने झालेल्या अपघातात शेरीचे रहिवासी असलेले तलाठी पोपट गोरे यांचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
पाटोदा तालुक्यातील भायाळा येथे कार्यरत असलेले तलाठी पोपट गोरे हे कामानिमित्त कडा येथे आले होते.त्यानंतर उशिरा आपल्या चारचाकी वाहनातून क्रमांक MH 16 BH 5758 या मधून जात असताना शेरी रस्त्यावर महावितरण कार्यालयाच्या अलीकडे काही मीटर अंतरावर वळणावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीने दोन ते तीन पलटी खाल्ली त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा:बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close