क्राईमताज्या घडामोडी

*इ पेमेंट दिल्याचे खोटे एस एम एस पाठवून वस्तू विकत घेणारी टोळी पकडली*

शेअर करा

 

अहमदनगर दि ९ नोव्हेंबर, प्रतिनिधी

 

जर तुम्ही ग्राहकाकडून इ पेमेंट घेत असाल तर पेमेंट झाल्यावर आपले खाते चेक करा कारण इ पेमेंट दिल्याचे खोटे एस एम एस पाठवून वस्तू विकत घेणारी टोळी अहमदनगर पोलिसांनी पकडली आहे.याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली.

ही टोळी दुकानात जाऊन तेथील क्यू आर कोड स्कॅन करून त्यामधील पेमेंट मोबाईल नंबर शोधून त्याला इ पेमेंट केले असल्याचे  बनावट एस एम एस तयार करून पाठवत असे.सोलापूर रस्त्यावरील सिद्धी पेट्रोल पंपावर असे पेमेंट केल्यानंतर हा प्रकार पेट्रोल पंप व्यवस्थापक प्रमोद अशोक खरे, वय-३२ वर्षे, रा. यशवंतनगर, केकती, अहमदनगर यांच्या  लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले .

पोलिसांनी तात्काळ पकडून चौकशी केल्यानंतर असे गुन्हे केले असल्याचे त्यांनी कबुल केले .अशा प्रकारचा गुन्हा  करणारी टोळी राज्यात पहिल्यांदा अहमदनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे .या आंतरजिल्हा टोळी कडून २,३६,०००/-रु. किमतीच्या मुददेमाल जप्त केला आहे.तसेच या टोळीने नगर मधील मोठ्या हॉटेल व्यावसायिकाला जेवण करून चुना लावला आहे.

हेही वाचा :अयोध्या येथील राम मंदिराच्या पुढील बैठकीचे भास्करगिरी महाराजांना निमंत्रण 

हा  गुन्हा दाखल झाल्यानंतर अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक करुन गुन्हे करणारी मोठी टोळी असण्याचं शक्यता असल्याने श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. सौरभकूमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचे तपासाबाबत सुचना दिल्याने त्यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी हे समांतर तपास करुन आरोपी व कारचा शोध घेत असताना सपोनि/शिशिरकूमार देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, वरील
नमुद गुन्हा करणारे आरोपी हे दरेवाडी शिवारात फिरत आहेत अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने सपोनि/शिशिरकुमार देशमूख व त्यांचे पथकातील सफौ/नानेकर, पोहेकॉ/सुनिल चव्हाण,पोना/संदिप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/योगेश सातपुते,प्रकाश वाघ,मेघराज कोल्हे अशांनी मिळून दरेवाडी परिसरात जावून मिळालेल्या माहीतीनुसार कार नं. एमएच-४४-डी-०००३ व तीमधील इसमांचा शोध घेतला असता दरेवाडी येथील अष्टविनायक मोबाईल शॉपी समोर सदरची कार उभी असल्याचे दिसले. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर कारला घेराव घालून कारमध्ये बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले.

त्यांना पोलीस स्टाफची ओळख सांगून त्यांना त्यांचे नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे, पत्ते १) संजय अशोक सोनार, वय- १९ वर्षे, रा. बालाजी रोड, टेल्को, भोसरी, पुणे, २) शुभम भगवान सोनवणे, वय- २४ वर्षे, रा. इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे, ३) रवि उत्तम पटेल, वय- १९ वर्षे, रा. धावडे वस्ती, भोसरी, पुणे, ४) राजु श्रीहरीलाल गुप्ता, वय- २१ वर्षे, रा. धावडे वस्ती, भोसरी, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यांना विश्वासात घेवून वरील नमुद
गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

त्याच प्रमाणे अधिक विचारपूस केली असता, त्यांनी मोबाईलमध्ये बल्क एसएमएस पाठविण्याचे अॅन्ड्रॉईड अॅपचा वापर करुन त्याव्दारे समोरच्या व्यक्तीला पैसे मिळाल्याचा सिस्टीम जनरेटेड मेसेज पाठवून फसवणूक करुन चोरी करीत असल्याचे सांगीतले. वरील नमुद आरोपींनी अशाप्रकारे आणखी कोठे-कोठे गुन्हे केलेले आहेत,याबाबत विचारपुस केली असता, त्यांनी यापुर्वी मागील दोन दिवसांचे कालावधीमध्ये १) रॉयल फुटवेअर,रांजणगाव गणपती, पुणे २) साईकुपा कम्युनिकेशन, वसंत टॉकीज जवळ, माळीवाडा, अहमदनगर, ३) अर्णव मोबाईल, कारेगाव, पुणे, ४) आयरीश हॉटेल, अहमदनगर येथे वरील प्रमाणेच फसवणूक करुन वस्तू खरेदी केल्या असल्याचे सांगीतले.
वरील नमुद आरोपीकडून फसवणुक करुन चोरी केलेले ०२ मोबाईल, विविध कंपनीचे बुट व सॅण्डल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली पांढ-या रंगाची आउट लँडर कंपनीची कार असा एकुण ०२,३६,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना मुद्देमालासह भिंगार कॅम्प पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पो.स्टे. करीत आहे.

नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते कि, क्यु आर कोड व्दारे ऑनलाईन व्यवहार करताना खात्यावर पैसे जमा झालेले आहेत अगर नाहीत याबाबत पुर्णपणे खात्री करुनच व्यवहार करण्यात यावेत. तसेच अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याबाबत नजिकचे पोलीस स्टेशनला तात्काळ दुरध्वनी करुन माहीती द्यावी.  कौतुकास्पद कामगीरी ही मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभकूमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक,अहमदनगर आणि विशाल ढुमे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close