ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*कोरोनाचे संकट दूर करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पांडुरंगाला साकडे*

पांडुरंगाची सपत्नीक पूजा

शेअर करा

 

पंढरपूर दि 1 जुलै टीमसीएम न्यूज

विठु माऊली,सध्या देशावर आणि राज्यावरील कोरोनाचे संकट आज पासुनच दुर कर पुन्हा एकदा संपूर्ण जगाला आनंदी आरोग्यदायी जीवन जगण्याची संधी दे…देवा पांडुरंगा काहीतरी चत्मकार कर आणि हे कोरोनाचं संकट दुर करण्याचे साकडे राज्याचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी पांडुरंगाला घातले.
बुधवारी आषाढी एकादशी निमित्तानं श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे ३;३०वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.यावेळी रश्मी ठाकरे मंत्री अदित्य ठाकरे पालकमंञी दत्ताञय भरणे.विभागिय आयुक्त दिपक म्हैसेकर मंदिर समितीचे गहिनीनाथ औसेकर महाराज उपस्थित होते.यंदा आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बडे यांना देण्यात आला.सहा वारकर्यापैकी एकाची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते रिंगण मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच त्यांनी स्वतः काढलेल्या ‘पहावा विठ्ठल’ या छायाचित्र संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच यात्रा अनुदानाचा पाच लाख रु.धनादेश पंढरपूर च्या नगराध्यक्षा साधना भोसले यांना देण्यात आला. तसेच पंढरपूरातील काही विकास कामे स्कायवाॕक अशी काही कामे अर्धवट असतील तर प्रस्ताव द्या पुर्ण करू असे आश्वासनही त्यांनी दिले.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close