*सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्तक्षेपाने बालविवाह टळला*
बीड दि 13 ऑक्टोबर ,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील वांगी या गावात होत असलेला बालविवाह बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाचे सदस्य आणि पोलीस यांनी थांबविला.पालकांचे समुपदेशन करण्यात आले.ही घटना दि 13 रोजी दुपारी घडली.
वांगी तालुका बीड येथे एका 16 वर्षाच्या मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती
बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाचे बीड जिल्हा सदस्य तत्त्वशिल कांबळे यांना मिळाली असता ते पोलिसांना घेऊन या गावात दाखल झाले.विवाह सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पालकांची भेट घेऊन त्यांना समज देण्यात आली .
वांगी ता.जि.बीड येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा नवगण राजूरी येथील 26 वर्षीय मुलासोबत विवाह होणार होता. सर्व सोपस्कार होण्यापूर्वी कांबळे यांनी आणि बीड ग्रामीण पोलीस यांनी जाऊन बालविवाह थांबवला मुलीच्या वडिलांचे मुलाचे व त्याच्या पालकांचे समुपदेशन केले त्यांच्या कडून शपथपत्र घेतले त्यांना बीड ग्रामीण पोलीस यांनी नोटीस देऊन बालविवाह न करण्याबाबत सांगितले.
One Comment