fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

*महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याची चित्रा वाघ यांची टीका*

शेअर करा

 

 

मुंबई दि 15 प्रतिनिधी

Advertisement

महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील येळम घाट येथे एका तरुणीवर ॲसिड हल्ला करून पेटवून दिल्याची घटना घडल्यानंतर राज्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की या राज्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कोणी वाली आहे की नाही? का महिलांची सुरक्षा ही फक्त भाषण आणि घोषणा यामध्येच अडकून पडली आहे काय?असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
युवतींवर होणाऱ्या ॲसिड हल्ल्यात यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री आणि अनिल देशमुख आंध्र प्रदेशामध्ये दिशा कायद्याचा अभ्यास संदर्भात गेले होते.मात्र त्यानंतर काय झालं. फेब्रुवारी महिन्यामध्ये सात अशा प्रकारच्या घटना घडल्या आणि आताही घडलेली आठवी घटना असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आतापर्यंत दिशा हा कायदा आलेला नाही.

हेही वाचा:प्रेयसीला रस्त्यातच जिवंत जाळण्याचा प्रयत्न;तब्बल 12 तास तरुणी मृत्यूच्या छायेत*

मला राज्य सरकारला विचारायचं आहे की कधी हा कायदा लागू होणार तसेच महिलांच्या सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार कधी गंभीर होणार अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केला आहे. पुरोगामी महाराष्ट्र मध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं ही योग्य नाही, असे सांगून त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी हा किंवा दिवाळीला हा कायदा लागू करून राज्यातील महिलांना भयमुक्त आणि डरमुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close