क्राईमताज्या घडामोडीमनोरंजन

*अभिनेता सुशांत सिंह राजपुत यांची राहत्या घरी आत्महत्या,पोलीस तपास सुरू*

शेअर करा

 

मुंबई दि 14 जून टीमसीएम न्यूज

अभिनेता सुशांत सिंह राजपुत यांनी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याच्या घरी आत्महत्या संदर्भात कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे
पोलिस उपायुक्त आणि प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली आहे.
सुशांत च्या आत्महत्या मुळे संपुर्ण बॉलिवूड हादरून गेले आहे . सुशांत च्या मृत्यूने अक्षयकुमार, अनुपम खेर ,यांच्यासह सर्वांना आणि त्याच्या चाहत्यांना चटका लागून गेला आहे .
पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्याने काय पोशे या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिकेत पदार्पण केलं होतं. एम एस धोनी, छिछोरे या चित्रपटांतून केलेल्या भूमिका नावाजल्या होत्या. वेगळ्या धाटणीच्या भूमिकेसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपुत प्रसिद्ध होता. तरुण आणि हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

राजपुत यांनी आत्महत्या केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळावरून अद्याप कोणतीही चिठ्ठी मिळाली नसल्याची माहिती पोलिस उपायुक्त आणि प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close