ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*रेड झोन मधील नागरिकांनी नगर जिल्हावासीयांची वाढविली धडधड जिल्ह्यात नवीन 9 बाधितांची भर एकूण संख्या@११२*

शेअर करा

 

अहमदनगर दि 29 मे टीम सीएमन्यूज

राज्यातील रेड झोन मधील नागरिक आपल्या मूळ गावी परतत आहेत .शहरातील दवाखान्यातील होणारी गर्दी आणि संभाव्य संसर्गाचा धोका लक्षात घेऊन अनेक नागरिक आपल्या गावी धोका पत्करून येत आहेत .येताना बरोबर कोरोना घेऊन येत असल्याचे नव्याने येत असलेल्या बाधितांच्या अहवालावरून दिसत आहे.आज अहमदनगर जिल्ह्यात नऊ बाधितांची भर पडली आहे .त्यामुळे एकूण बधितांचा आकडा 112 इतका झाला आहे .
अहमदनगर च्या रुग्णालयातील कोविड लॅब मध्ये तपासण्यात आलेल्या ६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
यातील बाधित हे वेगवेगळ्या ठिकाणाहून नगर जिल्ह्यात दाखल झाले आहेत .घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेला १, ठाणे येथून पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर येथील २, आणि राहाता तालुक्यातील निमगाव येथे ४ जण बाधित असल्याचे आढळून आले आहे.या बाधीत रुग्णामध्ये ०४ पुरुष,०४ महिला आणि ०१ वर्षीय लहान मुलगी यांचा समावेश आहे .
राहाता तालुक्यातील निमगाव येथील एक व्यक्ती बाधीत सापडली होती त्या व्यक्तीच्या संपर्कातील बाधीत रुग्णात वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे .संगमनेर येथील ४० वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पाठविले होते . दुसरा ५५ वर्षीय पुरुषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयाने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले होते . त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला .घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहे .तर चाकण येथून ढोर जळगाव येथे आलेला ३० वर्षीय युवक बाधीत आढळून आला आहे .
आढळुन आलेल्या विविध ठिकाणी आरोग्य विभागाच्या उपाययोजना सुरु असून लवकरच या भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली जाणार आहे .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: