ताज्या घडामोडीमराठवाडा

*धनगरवाडी (पिंपळा) येथे कोरोनाचेे रुग्ण आढळल्याने कन्टेनमेंट झोन घोषित* *पूर्णवेळ संचारबंदी लागू–जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

शेअर करा

 

बीड, दि.23 टीम सीएम न्यूज

आष्टी तालूक्यातील धनगरवाडी (पिंपळा) येथे कोरोना विषाणूचे लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत
याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे आष्टी तालूक्यातील धनगरवाडी (पिंपळा) या गावापासून ३ कि.मी. परिसरातील धनगरवाडी (पिंपळा), पिंपळा, काकडवाडी, नांदूर, खरडगव्हाण, सोलापूरवाडी हा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close