आरोग्यताज्या घडामोडी

Corona breaking *राज्यात आणखी 8 नवीन रुग्णाची भर संख्या 97 वर*

शेअर करा

 

मुंबई, दि. २३ मार्च ,टीम सीएमन्यूज

राज्यात सकाळी नवीन १५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती त्यामध्ये आणखी 8 रुग्णाची भर पडली असून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे हे चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . हज यात्रेसाठी एकाच कुटुंबतील लोक गेले होते. त्यांना कोरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
यापूर्वी ११ जण मुंबईतील तर प्रत्येकी एक रुग्ण पुणे, ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत. त्यामध्ये सातारा येथील एक ,मुंबईत तीन आणि सांगली मध्ये चार अशा मिळून 97 पर्यंत हा आकडा गेला आहे .
मुंबई आणि परिसरात आढळलेल्या १४ नवीन रुग्णांपैकी ९ जण हे यापूर्वीच्या कोरोना बाधित रुग्णांचे निकटसहवासित आहेत. इतर ५ जणांनी दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: