ब्रेकिंग न्यूज

*अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने केली शंभरी पार एकूण संख्या@१०३* नवीन 4 बाधित 4 मुक्त*

जिल्ह्यात आतापर्यंत ०९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

शेअर करा

 

अहमदनगर दि 28 मे टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी 4 नवीन कोरोना बाधित व्यक्तींची भर पडली आहे.तर 4 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत . अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांनी शंभरी पार केली आहे . त्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यात आलेल्या अशा एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 103 झाली आहे.

आज जिल्ह्यात ०४ नवीन रुग्ण आढळून आले . घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित सापडली.एक व्यक्ती नेवासा आणि एक श्रीगोंदा येथील आहेत .

या चौघांचे स्वब पझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायला सुरुवात केली असून लवकरच बाधित व्यक्तीच्या घराजवळच भाग बंद केला जाणार आहे .हा भाग अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे .

जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला .हे रुग्ण पाथर्डी आणि संगमनेर येथील प्रत्येकी ०१ तर सारसनगर येथील ०२ होते.आतापर्यंत एकूण ५८ रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: