ताज्या घडामोडीमराठवाडा

Corona fight *केज मध्ये तहसीलदारांनी लावली नागरिकांना शिस्त एक मीटरच्या चौकोनात उभे राहून नागरिकांनी शिस्तीने केली खरेदी*

शेअर करा

 

केज  दि 26 ,टीमसीएम न्यु्ज

किराणा साहित्य घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना एक मीटरच्या चौकोनात उभे करत शिस्तीने किराणा व औषधी साहित्याची खरेदी करण्याची शिस्त केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी हाती काठी घेऊन लावत असल्याचे चित्र गुरुवारी केज शहरात दिसून आले

केज शहरात सद्य परिस्थितीमध्ये नागरिकांना शिस्तीत जीवनावश्यक वस्तूची खरेदी किराणा व औषधी दुकाने तसंच भाजीपाला विक्री करणाऱ्या ठिकाणी प्रशासनाने एक एक मीटरचे अंतराचे चौकोन पांढऱ्या रंगाने आखणी करून दिले आहेत या चौकोनात उभे राहून योग्य अंतर राखून नागरिकांनी साहित्याची खरेदी करावी असे वारंवार प्रशासनाने सांगून खरेदीसाठी आलेले नागरिक दुकान समोर गर्दी करत असल्याने गुरुवारी केज तहसील कार्यालयाचे तहसीलदार दुलाजी मेंढके हे हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरून शहरातील कानडी रास्ता ,मुख्य महा मार्गावरील किराणा दुकान ,औषधी दुकाना समोर थांबून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची शिस्तीने खरेदी करण्यासाठी भाग पाडले केज शहरातील रस्त्यावरील दुकानास स्वतः तहसीलदार थांबून भेट देत असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता तहसीलदारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून शिस्तीने खरेदी केल्याचे चित्र दिसून आले यावेळी तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्या समवेत तलाठी लहू केदार ,सामाजिक कार्यकर्ते भाई मोहन गुंड ,गौतम बचुटे ,धनंजय कुलकर्णी ,यांच्यासह नाहरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते .

नागरिकांनी शिस्त बाळगावी – मेंढके

शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्या नंतर प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अमलबजावणी करावी व शिस्त बाळगावी साहित्याची खरेदी करताना दिलेल्या सूचनांचे पालन करावे ,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये गर्दी करू नये असे आवाहन यावेळी तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी केले

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close