आरोग्यताज्या घडामोडी

Corona fight *कोणाला मिळणार पेट्रोल,डिझेल*

शेअर करा

 

बीड दि .26 मार्च ,टीम सीएमन्यूज

Advertisement

देशात आपत्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाल्यानंतर कलम 144 लागू करण्यात आले .संचारबंदी असताना बीड जिल्ह्यातील नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे असे असताना जर कोणी विनाकारण फिरत असेल तर त्यांना डिझेल अथवा पेट्रोल मिळणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे .तसेच पेट्रोल पंप चालकांनी
या काळात विनाकारण फिरणाऱ्यांना पेट्रोल देऊ नये असे आदेश दिले आहेत .

यामध्ये अत्यावश्यक सेवा देण्यात येणारी वाहने (पिण्याचे पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, रुग्णालय, पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, सर्व प्रकारचे दवाखाने, वैद्यकिय महाविद्यालये, बँक, किराणा सामान दुकानदार, खाद्यतेल/अन्नधान्ये, दुध/दुग्ध उत्पादने, फळे, भाजीपाल्याचे वाहन, गॅस, औषधालये, अत्यावश्यक सेवा देणारे शासकिय कर्मचारी, शववाहिका) व सक्षम अधिकारी यांनी परवाना दिलेली वाहने यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा.

शेती व्यवसायाशी निगडीत वाहने/ यंत्र 2. प्रसारमाध्यमे (सर्व प्रकारचे दैनिक,
नियतकालिके, टि.व्ही.न्युज चॅनेल) यांची बाहने 3. घरपाहोच सेवा देणार्या आस्थापना (अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बीग बास्केट, झोमॅटो व
स्वीगी)यांची वाहने 4. दूरध्वनी, इंटरनेट, पोस्ट खाते, विद्युत व उर्जा विभाग यांची वाहने 5. औषध निर्मिती उद्योग व अत्यावश्यक सेवा
देणाच्या व आय.टी. संबंधित उद्योगांची वाहने यांना इंधन पुरवठा करण्यात यावा.

 

तसेच जमावबंदी कालावधीमध्ये इतर सर्व खाजगी वाहनांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करु नये. तसेच खाजगी टू-व्हिलर व फोर-व्हिलर धारकांना जमावबंदीच्या कालावधीमध्ये रस्त्यावर फिरण्यास सक्त बंदी/ मनाई करण्यात येत आहे.
उपरोक्त आदेशाचे अवाज्ञा करणाच्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम
188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि ईतर कलमांसह दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.असे आदेश राहुल रेखावार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,बीड यांनी दिले .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: