fbpx
आरोग्यताज्या घडामोडी

#Corona fight- *कोविड १९ च्या लढ्यासहनक्षलवाद्यांशी दोन हात:१७ बेपत्ता सैनिकांचे मृतदेह सापडले*

शेअर करा

 

रायपुर दि , २२ मार्च टीम सीएम न्यूज

Advertisement

 

देशात एकीकडे कोविड १९ सारख्या साथीच्या विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असताना मात्र छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात 17 बेपत्ता सैनिकांचे मृतदेह सापडले आहेत.
कोविड १९ विषाणू ला रोखण्याचे प्रयत्न असताना तिकडे छत्तीसगड मध्ये नक्षलवाद्यांनी डोके वर काढले आहे.बस्तर भागातील पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले की,सुरक्षा दलाने 17 जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांना जंगलाबाहेर काढले जात आहे. नक्षलवाद्यांशी चकमकी दरम्यान सैनिक शहीद झाले आहेत. सुंदरराज म्हणाले की, सुकमा जिल्ह्यातील एलामागुंडा  येथे झालेल्या माओवाद्यांच्या कारवायांनंतर शनिवारी डीआरजी, एसटीएफ आणि सीआयपीएफच्या कोब्रा बटालियनच्या सहाशे जवानांना चिंतगुफा, बुरखापाल आणि टाइमलवाडा येथून रवाना करण्यात आले.
ते म्हणाले की मिनपा  गावच्या जंगलात सुरक्षा दले असताना सुमारे 250 नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या घटनेत 15 सैनिक जखमी झाले आहेत. सुमारे अडीच तास दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्यानंतर नक्षलवादी तेथून पळून गेले.या घटनेनंतर 17 सैनिक बेपत्ता झाल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलाने नंतर बेपत्ता सैनिकांच्या शोधात शोधमोहीम राबविली. आज बेपत्ता सैनिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शहीद सैनिकांचे मृतदेह जंगलाबाहेर काढले जात आहेत.

यापूर्वी पोलिस अधिका्यांनी या घटनेत 14 जवान जखमी आणि 13 जवान बेपत्ता असल्याची नोंद केली होती.
चकमकीत जखमी झालेल्या जवानांना रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चकमकीनंतर आतापर्यंत १६  शस्त्रेही बेपत्ता आहेत, ज्यात एके४७  आणि अंडर-बॅरेल ग्रेनेड लॉन्चर्स सारख्या शस्त्रे आहेत.

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close