ताज्या घडामोडीमराठवाडा

Corona fight *खोटे सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करणार:पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार*

शेअर करा

 

बीड दि , 10 एप्रिल ,टीम सीएम न्यूज

जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अनेक नागरिक गंभीर आजाराचे प्रमाण पत्र देऊन पोलिसांकडून पास मिळवत असल्याचे पुढे आले आहे.असे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात आणि ज्या ऍम्ब्युलन्स मधून अशा प्रकारचे गंभीर असल्याचे दाखवून पेशंट नेले जात आहेत अशा ऍम्ब्युलन्स सेवा बंद करण्याचा इशारा बीडचे हर्ष पोद्दार यांनी दिला आहे.

सध्या बीड जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद आहेत कुठल्याही नागरिकांना बीड जिल्हा सोडून जायचे असेल तर त्यांना पोलिस विभागाकडून अत्यावश्यक असल्याचे कारण सांगून पास मिळवावा लागतो अशा परिस्थितीत अनेक नागरिक डॉक्टरांकडे जाऊन आजार गंभीर असल्याचे प्रमाणपत्र मिळवत आहेत. डॉक्टर सुद्धा अशा नागरिकांना मदत करत गंभीर असल्याचे प्रमाणपत्र देत आहे असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
गंभीर आजाराचे कारण सांगून या ऍम्ब्युलन्स मधून ही वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या गोष्टीचा आढावा घेऊन या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी असे कृत्य करणाऱ्या डॉक्टरांच्या विरुद्ध आणि अशाप्रकारे ऍम्ब्युलन्स सेवा देणाऱ्या ॲम्बुलन्स चालक संस्थेच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: