ताज्या घडामोडीव्यापार

Corona fight *ग्राहक सेवा केंद्रांवरील सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नाही-जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

शेअर करा

 

बीड, दि.29 मार्च ,टीम सीएमन्यूज

Advertisement

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळण्याकरिता ग्राहकांनी भारतीय स्टेट बैंकेने व महाराष्ट्र ग्रामिण बैंक या बँकांनी उपलब्ध करून दिलेल्या ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा. या ग्राहक सेवा केंद्रांवरील सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहकांनी या केंद्राचा वापर केल्यास त्यांना यासापर्यंत प्रवास करावा लागणार नाही व त्यांचे काम सोईचे होईल असे आवाहन जिल्हधिकारी यांनी केले आहे.
या साथरोगाच्या पाश्र्वभूमीवर दि.24 मार्च 2020 पासून जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू केलेले आहे. संचारबंदीच्या सुधारीत आदेशानुसार 14 एप्रिल 2020 रोजीपर्यंत बँकांची वेळ देखील सकाळी 7 ते 9.30 वाजेपर्यत करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत आर्थिक वर्षाचा शेवट मार्च अखेर असल्याने बँकांमध्ये संभाव्य होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे.
यामुळे तीन प्रकारच्या सेवा भारतीय स्टेट बैंक व महाराष्ट्र प्रामिण बैंक तर्फे ग्राहक सेवा केंद्रांवर पुरविल्या जाणार असल्यामुळे, या सेवा बँकांच्या शाखांमध्ये 14 एप्रिल 2020 रोजीपर्यंत पुरविल्या जाणार नाहीत. महाराष्ट्र ग्रामिण बैंकेतर्फे गांव निहाय व दिवस निहाय ग्राहक सेवा केंद्राचे वेळ बँकेकडून घोषित करण्यात येईल.
जिल्ह्यामध्ये आज रोजी भारतीय स्टेट बैंकेचे 305 सेवा केंद्र (CST) कार्यरत असून या केंद्रा मार्फत 10 हजार रुपये पर्यंत पैसे काढणे, 20 हजार रुपये पर्यंत पैसे भरणे, 20 हजार रुपये पर्यत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरणे या सेवा पुरविण्यात येतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या अंदाजित 200 ग्राहक सेवा केंद्र (CSP) असून या ग्राहक सेवा केंद्रामार्फत 20 हजार रुपये पर्यंत पैसे काढणे, 20 हजार रुपये पर्यंत पैसे भरणे व 50 हजार रुपये पर्यंत इतरांच्या खात्यामध्ये पैसे भरणे या सेवा पुरविण्यात येतात.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: