आरोग्यताज्या घडामोडी

Corona fight *फवारणीसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक स्वतः उतरले रस्त्यावर*

शेअर करा

 

आष्टी दि,26 मार्च टीम सीएमन्यूज

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कडा ग्रामपंचायतच्या वतीने जंतुनाशक सोडीअम हायपोक्लोरीक सोलूशन या औषधाची गुरुवारी दि.२६ रोजी फवारनी कराण्यात आली .

ज्या ठिकानी नागरीक गर्दी करतात तसेच गावातील प्रमुख बाजारपेठेत ही फवारनी करण्यात आली आहे . या मुळे कोरोना व ईतर जंतुचा संसर्ग टाळण्यास फायदा होनार आहे . स्वत: सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ,ग्रा पं कर्मचारी यांनी ही फवारनी केली.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव पाहाता ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत दि.२६ गुरुवार रोजी सोडीअम हायपोक्लोरीक सोलूशन या जंतु रोधक औषधाची फवारनी करण्यात आली ही फवारनी संपुर्ण शहरात करण्यात येनार असुन कोरोना सोबतच साथ रोग या फवारनीने नष्ट होण्यास फायदा होनार आहे .

भाजीमंडई, किराणा दुकाने यांच्यासमोर ग्रामपंचायत च्या वतीने चुना पावडर टाकून एक मीटर अंतरावर मार्केआउट करून दिले आहे, जेणेकरून अत्यावश्यक सेवेसाठी नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करणार नाहीत.
कड्यातील नागरिकांनी रस्त्याने फिरू नये,संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे तसेच पुण्या मुंबई वरून आलेल्यांची नावे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामपंचायतला कळवण्याचे आवाहन सरपंच दिपमाला अनिल ढोबळे यांनी केले आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: