ताज्या घडामोडीमराठवाडा

Corona fight  *मजूर कामगारांची व्यवस्था शाळांमध्ये करण्यात येणार -मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार*

शेअर करा

 

बीड, दि.29 मार्च ,टीम सीएमन्यूज

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या फैलावामुळे लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्याने विविध व्यवसाय – उद्योगातील मोलमजुरी करणारे मजूर, कामगार त्यांच्या मुळ गावी परत जाण्याचा मार्ग शोध आहेत. त्यांना आसरा देण्यासाठी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.
शासनाने राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला असल्यामुळे या शाळा निवाऱ्यांसाठी उपलब्ध होण्यासाठी गट विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.
ही व्यवस्था करताना हात धुण्यासाठी साबण, पाण्याची सोय या शाळास्तरावर करण्यात यावी. पिण्यासाठीच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हाधिकारी बीड यांनी निश्चित केलेल्या निर्देशांचे पालन करावे असे कळविले आहे.
जिल्हयाच्या सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. तरीही काही नागरिक नियम उल्लंघन करुन जिल्हयात प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहेत. अशा नागरिकांची माहिती घेवून त्यांना त्वरीत इतरांपासून अलगीकरण करुन जिल्हा परिषद शाळांमध्ये निवारा उपलब्ध करुन दयावा. सदर निवारा उपलब्ध करुन देत असताना अशा नागरिकांच्या मुळ गावापासून दूर असलेल्या शाळेमध्ये त्यांना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. निवारा उपलब्ध करुन देत असताना रोजंदारी मजूर व जिल्हा बाहेरुन आलेले नागरिक यांना स्वतंत्रपणे सोय करणे तसेच निवासासाठी असलेल्या सर्वांना एकमेकांपासून किमान ६ फुट अंतर ठेवणे बंधनकारक केले आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: