क्राईमताज्या घडामोडी

Corona fight-nagar *शहरात चारशेहून अधिक दुचाकी जप्त-पो उपाधीक्षक संदीप मिटके*

शेअर करा

 

दि 5 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

संचार बंदीच्या काळात अहमदनगर मधील नागरिक सातत्याने बाहेर पडत असल्याचे प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी जप्त केल्याअसल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले .

अहमदनगर शहराचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलिसांनी आज विविध ठिकाणी कारवाई करत रस्त्यावर फिरणाऱ्या व अनावश्यक दुचाकी घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली या कारवाईमध्ये त्यांनी दुचाकी गाड्या जप्त केल्या. कोतवाली पोलिस ठाण्यात आतापर्यंत या जप्त केलेल्या गाड्यांची संख्या चारशेहून अधिक झाली आहे असे शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.
विनाकारण नागरिकांनी बाहेर पडू नये ,पडल्यास गाडी जप्त करण्यात असेही त्यांनी सांगितलं .ही मोहीम वाढविण्यात येणार असल्याचे सांगून घरात बसण्याचे आवाहन त्यांनी केली .

Advertisement
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close