आरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*परळीच्या स्टेट बँकेतील कोरोना पॉझिटिव्ह वाढले,जिल्ह्यात 17 बाधित*

शेअर करा

 

बीड दि 9 जुलै टीमसीएम न्यूज

बीड जिल्ह्यातील परळी येथील स्टेट बँकेतील कर्मचारी कोरोना बाधित आल्यानंतर कोरोनाची रांग लागली आहे.त्यानंतर सलग आलेल्या स्वब टेस्टिंग मध्ये विविध ठिकाणी स्टेट बँकेतील कोरोना बधितांचा आकडा वाढला आहे .
बीड जिल्ह्यातील केलेल्या 262 स्वब पैकी 17 पॉझिटिव्ह आले आहेत .यातील 9 जण परळीतील स्टेट बँकेशी संबंधित आहेत.
परळीतील स्टेट बँकेत कोरोना घुसल्यानंतर या बँकेत काम करणाऱ्या विविध ठिकाणच्या कर्मचारी बाधित झाले आहेत.
परळी येथील ०६ जण बाधित झाले.यामध्ये ४५ वर्षीय पुरुष (एसबीआय बॅक कर्मचारी), परळी शहर ३३ वर्षीय पुरुष (एसबीआय परळी कर्मचारी), परळी शहर ७१ व ०७ वर्षीय पुरुष (एसबीआय कर्मचा-याचे कुटुंबीय), परळी शहर ४६ वर्षीय पुरुष (एसबीआय बॅकेचा ग्राहक), परळी शहर ,२३ वर्षीय पुरुष (एसबीआय बॅकेचा ग्राहक, रा.दादाहरी वडगाव),यांचा समावेश आहे.त्याचबरोबर अंबेजोगाई येथील याच बँकेशी संबंधित ०३ जण पॉझिटिव्ह आले .त्यामध्ये अंबाजोगाई मधील ३६ वर्षीय महिला, १५ व १३ वर्षीय पुरुष एस.बी.आय.परळी कर्मचा-यांचे कुटुंबिय रा.शिक्षक कॉलनी, मोरेवाडी यांचा सामावेश आहे.
उर्वरित बधितांमध्ये गेबराई येथील ०२ हे २६ वर्षीय महिला (ईस्लामपुरा गेवराई पॉझिटिव्ह सहवासीत), गेवराई शहर २८ वर्षीय पुरुष (पुणे हुन आलेला रा.केकतपांगरी),बीड तालुक्यातील ०६ आले असून त्यामध्ये ६८ वर्षीय पुरुष (स्टेट बॅक कॉलनी,परवाना नगर,बीड), बीड शहर,४३ वर्षीय पुरुप (मोमोनपुरा, मक्का चौक), बीड शहर ३० वर्षीय पुरुष (विद्यानगर पुर्व), बीड शहर ८३ वर्षीय स्त्री (गोविंदनगर, बीड) बीड शहर ५५ वर्षीय पुरुष (साक्षाळपिंप्री),
३० वर्षीय पुरुष (वंजारवाडी)बीड तालुक्यातील ६ रुग्णांपैकी ३ रुग्ण हे बीड शहरातील मेगासर्वेतुन आढळलेले आहेत.

उर्वरित 238 स्वब निगेटिव्ह आले असून 7 अनिर्णित राहिले आहेत.त्यांचा अहवाल आज मिळू शकतो .
या सर्व भागात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कंटेनमेंट झोन घोषित केले आहेत.यामध्ये बीड तालुक्यातील वंजारवाडी व साक्षाळ पिंपरी गेवराई तालुक्यातील केकत पांगरी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव यांचा समावेश आहे.तर परळी,बीड येथे यापूर्वीच बंद घोषित करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close