fbpx
आरोग्यताज्या घडामोडी

*लघवी test द्वारे कोरोना तपासणी संशोधनाला वेग*

शेअर करा

 

 

नवी दिल्ली दि १ नोव्हेंबर

 

लघवीचा वापर करून कोरोना कसा ओळखता येऊ शकतो याचे संशोधन सुरु आहे.

Advertisement
कोरोनाच्या विविध तपासण्या सध्या वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध नाहीत. मात्र भविष्यात विविध मार्गाने कोरोना कसा ओळखता येईल यासाठी विविध शरीरातील द्रवांचा वापर केला जात आहे. असाच लघवीचा वापर करून कोरोना कसा ओळखता येऊ शकतो याचे संशोधन सुरु आहे.

 

कुठे आहे संशोधन सुरु ?

 

कोरोना संशोधनासाठी लघवी तपासणीतून कोरोना बाधित आहेत का नाही याची तपासणी सध्या भारतातील उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मोतीलाल  नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात सुरु आहे.

 

प्रचलित कोरोना तपासणी पद्धती

सध्या जगात दोन कोरोना तपासणी पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामध्ये आरटीपीसीआर आणि ANTIGEN या दोन चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत. याच दोन चाचण्यांच्या माध्यमातून जगात कोरोना बाधित रुग्णांची ओळख पटविली जात आहे. लघवीच्या माध्यमातून कोरोना तपासणी चाचणी यशस्वी झाल्यास तुम्हाला कोरोना टेस्ट LAB मध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही आपल्या घरून एकाद्या बाटली मध्ये आपली लघवी घालून ते LAB मध्ये पाठवू शकता. मात्र या प्रकारचे संशोधन झाले तर ते शक्य आहे. त्यासाठी मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेज प्रयत्नशील आहे.

 

भविष्यात आणखी विविध पद्धतीने कोरोना चाचण्या विकसित होण्याची शक्यता अधिक आहेत.

हेही वाचा :नगर जिल्ह्यात २०७ रुग्णांना डिस्चार्ज तर २६० नवीन कोरोना बाधित 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close