ताज्या घडामोडी

Corona update *आष्टीच्या विलगिकरण कक्षात 9 दाखल*

शेअर करा

 

आष्टी दि,9 एप्रिल ,टीम सीएम न्यूज

आष्टी तालुक्यातील पिंपळा  येथील एक संशयीत कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हात खळबळ उडाली.या रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या नागरिकांचा प्रशासन शोध घेत असून आज नऊ नागरिकांना आष्टीच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कोठुळे यांनी दिली .
बीड जिल्हात कोरोना ला रोखण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असताना एक बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे .या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या रुग्णाचा अहवाल नकारात्मक आल्याने त्याला नगरहून आष्टी येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले.प्रशासन याची काळजी घेत असून त्याच बरोबर संपर्कातील आणखी 8 नागरिकांना या विलगिकरण कक्षात दाखल केले आहे .
आष्टी तालुक्यातील पिंपळा गावापासून आजूबाजूच्या तीन किमी वरील सूंबेवाडी ,धनगरवाडी ,काकडवाडी ,ठोंबळसांगवी खरडगव्हाण हा परिसर कोरंटाईन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे पुढील ४ किमी परिसरात बफर झोन असून या झोन मध्ये लोणी ,नांदूर ,सोलापूरवाडी खुंटेफळ कोयाळा यांचा समावेश करण्यात आला आहे हा भाग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे या भागात कडक संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close