fbpx
आरोग्यताज्या घडामोडी

Corona update *जामखेड मध्ये 1 संगमनेर मध्ये 2 जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला*

शेअर करा

 

नगर दि 2 एप्रिल टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव रुग्णांचा आकडा वाढत आहे आज मिळालेल्या माहितीनुसार आणि प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे कळवले होते त्यामध्ये आणखी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये एक जामखेड आणि दोन संगमेनर येथील आहेत . त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17इतकी झाली आहे
आज प्रशासनाला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या मार्फत एक्कावन्न जणांचे अहवाल प्राप्त झाले या 51 जणांच्या अहवालामध्ये सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे प्रशासनाने कळविले होते .त्यानंतर आणखी तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले .
यापूर्वी अहमदनगर मध्ये 8 रुग्ण होते त्यापैकी एकाला घरी सोडण्यात आले आहे .
पहिल्या सहा मध्ये दोन परदेशी, दोन मुकुंदनगर भागात राहिलेले परप्रांतीय ,तर दोन संगमनेर येथील नागरिक आहेत . परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील आहे .बाधित व्यक्ती १७ ते ६८ वर्षे वयोगटातील आहेत.आता तिघे पैकी एक जामखेड दोन संगमनेर येथील आहेत .संगमनेर येथील बाधित व्यक्ती ५९ आणि ४० वर्ष वयाच्या तर जामखेड येथील व्यक्ती २० वर्षाचा आहे.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close