आरोग्यताज्या घडामोडी

Corona update *जिल्ह्यात तातडीने ११ ठिकाणी विलगीकरण कक्ष तातडीने स्थापन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*

शेअर करा

 

बीड, दि, २० मार्च, टीम सीएमन्यूज

कोरोना विषाणूचा (COVID-19) संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाचाअनुषगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात तातडीने अकरा ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राहुल रेखावार, अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी बीड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 33 आणि 65 अन्वये जिल्ह्यातील खालील ठिकाणी व इमारतींमध्ये कक्ष स्थापन करण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत.
बीड मधील शासकीय आयटीआय वस्तीगृह , नगर रोड , बीड येथे २०० खाटांची व्यवस्था असलेले कक्ष निर्माण करण्यात येत आहे त्याच बरोबर इतर तालुक्याच्या ठिकाणी 50 रुग्ण क्षमतेच्या खाटांची व्यवस्था असलेली कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. अंबाजोगाई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह , केज येथे सामाजिक न्याय भवन मध्ये वडवणी येथे कस्तुरबा गांधी शासकीय वस्तीगृह मध्ये , पाटोदा येथे समाज कल्याण मुलींचे वस्तीग्रह मध्ये , धारूर येथे समग्र शिक्षण मुलींचे वस्तीगृह मध्ये , आष्टी येथे आयटीआय कॉलेज बिल्डिंगमध्ये , शिरूर कासार येथे समाज कल्याण वसतिगृह मुलींचे मध्ये , परळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह मध्ये, गेवराई येथे नगर परिषद मंगल कार्यालय मध्ये, आणि माजलगाव येथेे माऊली मंगल कार्यालय मध्ये विलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत करोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झालेल्या रुग्णांवर विलगीकरणाची कार्यवाही करणे आवश्यक आहे. संशयित कोरोना विषाणू संसर्ग व्यक्तींना विलगीकरण कक्षात (Quarantine Places ) 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवणे आणि जर कोणी व्यक्ती कोरोना विषाणू संसर्ग संक्रमित झालेल्या आढळून आल्यास स्वतंत्र अलग असलेले कक्ष(Isolation Ward ) मध्ये ठेवणे आवश्यक आहे.
कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता. त्यावर प्रतिबंधात्मक व पूर्वतयारी योजना आखणे आवश्यक आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पुर्वतयारी करणेत आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close