आरोग्यताज्या घडामोडी

Corona update *बीड जिल्ह्यात जनता कर्फ्यु सकाळी 5 पर्यंत :जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

शेअर करा

 

बीड दि 22 मार्च टीम सीएमन्यूज

कोरोना व्हायरस या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी आज पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्यू रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे .मात्र बीड जिल्ह्यांमध्ये हा जनता कर्फ्यू सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असून जनतेने त्याची कडक अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यामध्ये आपत्ती कायदा लागू करण्यात आला असून या कायद्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा ,बँका, भाजीपाला,दूध,फळे,माध्यमे शासकीय निमशासकीय कार्यालय ,एसटी रेल्वे यासह इतर सेवा वगळता 31 मार्च पर्यंत सर्व आस्थापना बंद असणार आहे .जिल्ह्यातील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॉटेल,धाबे,यावर होणारी गर्दी लक्षात घेता आपत्ती निवारण कायदा 2005 नुसार हे बंद ठेवण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close