ताज्या घडामोडीमराठवाडा

Corona update *बीड जिल्ह्यात विना परवाना प्रवास करणाऱ्यांची रवानगी शेल्टर होम मध्ये*

शेअर करा

 

बीड दि 1 एप्रिल , टीम सीएमन्यूज

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा लॉक केल्या असताना आणि राज्यात आपत्ती निवारण कायद्यासह संचारबंदी लागू केली असताना ऊसतोड कामगार आणि परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने घराकडे परतत आहेत .बीड जिल्ह्यातील विविध चेक पोस्ट वर पेट्रोलिंग करत असताना तीन विविध वाहनातून हे प्रवास करत असताना पोलिसांना आढळून आले आहेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या
हद्दीत नगरनाका येथे दुपारी आयशर ट्रक 46 प्रवाशांची वाहतुक करतांना आढळून आले.नगरनाका या भागात 09 ट्रक्टर मध्ये एकूण 170 प्रवाशी प्रवास करतांना आढळून आले. त्यांना वाहनांसह ताब्यात घेवून
मा.तहसिलदार यांना कळवून पुढील कारवाई करून त्यांना सेल्ट्र होम वासनवाडी शाळा, सैनिकी शाळा नवगण राजूरी, अग्री कल्चर कॉलेज येथे ठेवण्यात आले आहे. तहसिल प्रशासनाने हे प्रवाशी (ऊसतोड कामगार) यांची सेल्ट्रर होम मध्ये अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे. पोलीस ठाणे पिंपळनेर हद्दीत पिंपळनेर पोलीसांनी उमरी फाट्यांवर आयशर मध्ये 18 लोक एकत्रीत कोल्हापूर ते माजलगांव प्रवास करतांना आढळले. त्यांना ताब्यात घेवून महसुल प्रशासनाला कळवून सेल्ट्रर होम सैनिकी शाळा नवगण राजूरी, येथे ठेवण्यात आले आहे. तहसिल प्रशासनाने हे प्रवाशी (ऊसतोड कामगार) यांची सेल्ट्रर होम मध्ये अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे. पोलीस ठाणे नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत मांजरसुभा फिक्स पाईंट येथे नेकनूर पोलिसांनी पाटोद्याच्या रस्त्यांने आलेला कंटेनर तपासला असता त्यात 32
प्रवासी बंगलोर ते राज्यस्थान प्रवास करताना आढळून आले . त्यांना ताब्यात घेवून पोलीस टाण्यांस नेवून चालकांवर 269,188 भादंवि , मोटार वाहन कायदा 66,192 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच महसुल प्रशासनाला कळवून त्यांना सेल्ट्र होम मध्ये ठेवण्यात आले आहे.पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत पठाण मांडवा शिवार वाण नदी जवळ दुधाचे ट्रकमधुन प्रवास करतांना 24 जणांना अंबाजोगाई पोलीसांना पकड़ले त्यांच्या विरूध्द भादंवि 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ब नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोणीही बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या परवानगी शिवाय प्रवेश करू नये.तसे केल्यास त्या संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.असे आवाहन पोलिसांनी केले आहे .

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: