आष्टी दि,15 । टीम सीएमन्यूज
बीड जिल्ह्यातील आष्टीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असा मजकूर लिहून विविध वृत्त वाहिन्यांच्या नावाने फेक पोस्ट तयार करून व्हाट्सएपच्या स्टेट्सला ठेवून अफवा पसरविल्याच्या करणारे आष्टी पोलिसांची दोघांवर गुन्हा दाखल केला आहे .
याबाबतची माहिती अशी की ,आष्टी येथील एका युवकाच्या फोटोसह आष्टीतील पहिला कॊरोना रुग्ण म्हणून ऋषिकेश वीर आणि प्रथमेश आवारे यांनी पोस्ट तयार करून स्टेटस ला ठेवल्या होत्या .त्यानंतर संबंधित मुलाला फोन करून पोस्ट पाहण्यास सांगितल्या .ही पोस्ट वाचल्याने पीडित मुलाला धक्का बसला त्याने पोस्ट डिलीट करावी म्हणून सांगितले ,मात्र तोपर्यंत पोस्ट विविध ग्रुपवर व्हायरल झाली होती .अनेकांनी या पोस्ट पाहून त्या पीडित मुलाला फोन केले त्यामुळे धास्ती घेतलेल्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली .या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास पोलीस उपनिरीक्षक अमित करपे करत आहेत.