आरोग्यताज्या घडामोडीशैक्षणिक

Corona-virus- *राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय*

शेअर करा

*जिल्हा परिषद च्या शाळा वगळून महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील शाळा बंद राहणार*

*सर्व महाविद्यालय आणि प्रशिक्षण संस्था ही राहणार बंद*

 

मुंबई दि 14 मार्च । टीम सीएमन्यूज
करोना विषाणुचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व संस्था अंगणवाडी 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
डॉ. प्रदीप व्यास प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन यांनी सर्व विभागांना कळविले आहे.
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व
नियमावलीमधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारयांच्या मान्यतेने दिनांक ३१ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्याबाबत याद्वारे
सूचित करण्यात येत आहे.
तथापि, या सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील १० व १२ च्या परिक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परिक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्या असाही निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्याथ्यच्या संपर्कात येणार नाही यासाठ़ी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधीत संस्था प्रमुखास देण्यात याव्यात. तरी उपरोक्तनुसार तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आपल्या अधिपत्याखालील सर्व आस्थापनांना
सूचित करण्यात यावे त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे.शासनाने करोना विषाणूचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close