आरोग्यताज्या घडामोडी

Corona virus-pune- *पुण्यात एक लाख किंमतीचे बनावट सॅनिटायझर जप्त : पुणे पोलिसांची कारवाई*

शेअर करा

पुण्यात एक लाख किंमतीचे बनावट सॅनिटायझर जप्त : पुणे पोलिसांची कारवाई
पुणे :

Advertisement

हॅन्ड सॅनिटायझरचा समावेश सरकारने आवश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यामुळे त्यातून फायदा व्हावा या उद्देशाने पुण्यात बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या तीन व्यक्तींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
अजय शंकरलाल गांधी , मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांनी 1 लाख 2 हजार 419 रुपये किंमतीचे बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवले होते.

कोरोनामुळे सध्या पुणे शहरात सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.अशावेळी आरोपींनी घरातल्या घरात कारखाना तयार केला. त्यासाठी त्यांनी रिकाम्या बाटल्या आणि नामांकित कंपन्यांचे स्टिकर वापरले. त्यासाठी त्यांनी मुंबईतील एका कंपनीतून पाच लिटरचे कॅन आणले व त्यातून छोट्या बाटल्या तयार केल्या. त्यानंतर हे सॅनिटायझर पुण्यातल्या लोकल मार्केटमध्ये विकण्यात आले .

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .अशावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिक सॅनिटायझर आणि मास्क विकत घेत आहेत. याचाच फायदा घेत हे रॅकेट उदयास आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तवाडी परिसरामध्ये कारवाई केली.

दरम्यान सॅनिटायझर, मास्कच्या गैरप्रकाराबाबत नागरीकांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरीत पोलिस नियंत्रण कक्षाच्या 100 क्रमांकावर कळवावी किंवा 8975283100 व्हॉटस्‌अप क्रमांकावर माहिती पाठवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: