ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

*बीड शहरासह काही गावातील संचारबंदी हटवली*

कंटेन्मेंट झोन बफर झोन मधील बंदी कायम राहणार

शेअर करा

 

बीड 30 मे टीम सीएमन्यूज

Advertisement

बीड शहरासह जिल्ह्यातील काही भागात संचारबंदी हटविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रात्री उशिरा काढलेल्या आदेशात जाहीर केले आहे .
कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन वगळता इतर ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात आल्याचे आदेशीत करण्यात आले आहे .

कारेगाव तालुका पाटोदा येथील एका बाधित व्यक्तीने बारा गावात संपर्क केल्याचे आढळून आल्यानंतर हे गावे सील करण्यात आले होते. या गावातील त्या बाधितांच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिल्यानं या भागातील संचारबंदी उठविण्यात आली आहे .

शिथिल करण्यात आलेल्या गावामध्ये बीड शहर व बीड तालूक्यातील खंडाळा, चन्हाटा, पालवण व इट, पाटोदा तालूक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालूक्यातील देवडी, गेवराई तालूक्यातील खांडवी,मादळमोही व धारवंटा ,केज तालूक्यातील खरमाटा व धारुर तालूक्यातील पारगांव यांचा आहे .तर मोमीनपुरा-अशोकनगर, जयभवानीनगर,सावतामाळी चौक, संभाजीनगर बालेपीर येथील परिसरात प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवणे ठेवण्यात येत आहे. असे आदेशात म्हटले आहे .

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: