ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

*विद्यापीठाच्या सर्व विभागाच्या पदवी परिक्षा १ ऑक्टोबर पासून-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत*

शेअर करा

 

महेश डागा
औरंगाबाद दि 19 सप्टेंबर

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व विभागाच्या पदवी परिक्षा या १ ऑक्टोबर पासून सुरु होणार ‌असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विभागात १,१६,४०० विद्यार्थी परिक्षा देणार असून यापैकी ९० टक्के विद्यार्थी हे ऑनलाईन पद्धतीने तर १० टक्के विद्यार्थी हे ऑफलाईन पद्धतीने परिक्षा देतील असेही त्यांनी सांगितले. जे विद्यार्थी या परिक्षेत अनुत्तीर्ण होतील त्यांच्या परिक्षा एक महिन्याच्या आत घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:माळवदाचे घर कोसळून एक जण जागीच ठार

कोविड काळात परिक्षा घेऊन दिलेल्या पदवी बाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या पदवीचा आदर सर्वांनी केला पाहिजे अन्यथा सरकार त्यांच्या विरोधात कारवाई करेल असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परिक्षांबाबतचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत औरंगाबादेत आले होते.

कोरोनाच्या काळात महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क जसे ग्रंथालय शुल्क, इमारत शुल्क इ. तसेच परीक्षा शुल्क परत किंवा कमी करण्याबाबतचा निर्णय याबाबत होणाऱ्या बैठकीनंतर घेण्यात येईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संतपीठ जानेवारी पासून सुरू करण्यात येईल. स्वायत्त संस्था म्हणून महाराष्ट्र सरकार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या मध्यातून ही संस्था काम करेल. त्यासाठी सुरुवातीला २२ कोटींचा खर्च येईल, सुरुवातीला विद्यापीठाने हा खर्च करायचा आहे, आणि नंतर सरकार हा खर्च परत देईल. संतपीठाची जागा विद्यपीठाच्या नावावर केली अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

आमचे सरकार जे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे त्या झालेल्या निर्णंयाचेच निवेदन देऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही विद्यार्थी संघटना करत असून जळगांव येथील दौऱ्यात माझी गाडी अडवत माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. राज्यभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधामुळे मला मोठी सुरक्षा देण्यात आल्यामुळे मला केंद्रातील मोठा मंत्री असल्यासारखे वाटत असून मला या विद्यार्थी परिषदेचे आभार व्यक्त करतो तसेच या विरोधामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा नेते विनोद तावडे नसतील अशी उपरोधिक टिका यावेळी उदय सामंत यांनी केली.
मात्र एवढी सुरक्षा असतानाही मला काळे झेंडे दाखवले जातात, माझ्या ताफ्यावर हल्ला केला जातो या प्रकाराची चौकशीची मागणी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युती केली नसती तर भाजपाने विधानसभा २०१९ निवडणुकीत १५० जागा जिंकल्या असत्या असे विधान केले त्यांवर पहाटे शपथ घेऊनही त्यांची सत्तेची स्वप्नपुर्ती झाली नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली अशी टिका उदय सामंत यांनी केली.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: