ताज्या घडामोडी

*पुणे शहर नाभिक मंडळ तर्फे”माझे सलून दुकान माझी” मागणी आंदोलन*

शेअर करा

 

 

शेखर गौड
पुणे दि,10 जून
पुण्यातील सिहंगड रोड येथे पुणे शहर नाभिक मंडळ तर्फे ” माझे सलून दुकान माझी मागणी” ही टॅगलाईन वापरून सलून दुकान पुन्हा उघडण्यासाठी नाभिक संघटनेनं आणि सलून दुकानदारांनी आंदोलन केले .
कोविड १९ मध्ये गेले तीन महिण्यापासून सलून आणि कटिंग चे दुकान बंद आहेत. दुकानात काम करणारे कारागीर आणि मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वारंवार सरकारला मागण्या करून देखील सलून ची दुकाने बंद आहेत. सिहंगड परिसर , कोथरूड पार्वती विभागातील दुकानदार आणि कारागिरांनी ” माझे सलून दुकान माझी मागणी “आंदोलन केले.दुकान सुरु करण्यात यावे ,कोरोनामुळे आमचे कुटुंब संकटात आले आहे.कारागीर बेरोजगार आहेत. परराज्यांतील कामगारांचे काम गेले आहेत. आमच्या विविध मागण्या साठी आम्ही हे आंदोलन करत असल्याचे पुणे शहर नाभिक महामंडळ अध्यक्ष महेश सांगला यांनी सांगितले.

काय आहेत नाभिक मंडळ मागण्या
ब्यूटी/सलून व्यवसाय
१) मागिल २ महिने व पुढील काही महिन्याचे नाभिकांस/सलून व्यवसायीकांस रु.१५,०००/- आर्थिक सहाय्यता निधी प्रत्येकांस कधी मिळणार?

२) कोव्हिड १९ चे संसर्गासाठी नाभिकांस/सलून व्यवसायीकांस रु.५ लाख आरोग्य सुरक्षा कवच व रु.२५ लाख जीवन सुरक्षा कवच हे शासनाने विमा संरक्षण कधी मिळणार?

३) सलून व्यवसाय हा सेवा व्यवसायात येत असल्यामुळे शासनाने नाभिकांस/सलून व्यवसायीकांस पीपीई किट, हँन्ड सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, सोडीयम हायड्रोक्लोरायीड,मास्क,फेस शिल्ड हे नाभिकाचे व गिऱ्हाईकाचे सुरक्षितते साठी मोफत द्यावे.

४) शासनाने नियम व अटीसह सलून व्यवसाय सुरु करणे सर्शत परवानगी कधी पर्यत मिळेल.
५) सलून व्यवसाय बंद आहे त्या काळातील (लॉकडाऊन काळातील) सलून व्यवसायीकांचे लाईट बिल माफ होईल का ?

६) सलून व्यवसाय बंद आहे त्या काळातील (लॉकडाऊन काळातील) दुकान भाडे,घर भाडे माफ करणेसाठी शासनाने शासकीय आदेश काढून नाभिकांस/सलून व्यवसायीकांस दिलासा द्यावा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close