क्राईमताज्या घडामोडी

*पोलीस उपाधीक्षक पथकाकडून कडा नदीचे पात्रातील अवैध हातभट्टी निर्मिती अड्डा उध्वस्त*

पोलीस उपाधीक्षक पथकाची कारवाई

शेअर करा

 

आष्टी दि 30 मे टीम सीएमन्यूज

Advertisement

कडा परिसरातील कडी नदीच्या पात्रात सुरू असलेला गावठी दारू अड्डा आष्टी पोलीस उपाधीक्षक पथकाने रात्री उशिरा छापा टाकून उध्दवस्त केला.

उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना मिळालेल्या माहितीनुसार कडा येथे तावरे वस्ती जवळ, कडी नदीचे पात्रात विशाल प्रकाश शिरोळे व अमर प्रकाश शिरोळे हे दोघे गावठी हातभट्टी दारूची निर्मिती ,विक्री करण्यासाठी करीत असताना छापा मारला असता दोन्ही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले .पोलिसांना या ठिकाणी 02 लोखंडी बॅरेल, तयार केलेल्या हाथभटी दारूने भरलेले 02 प्लास्टिक कॅन, तयार हाथभट्टी दारू, दारू तयार करण्याचे साहित्य, गुळमिश्रित रसायन असे एकूण 11100/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला .

हेही वाचा : मुंबई वरून आलेल्या ग्रामस्थांना वाजतगाजत केले कोरोंटाईन

दोन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये पोलीस उपअधीक्षक पथका कडुन पो स्टे आष्टि येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close