ताज्या घडामोडीराजकीय

भाजपचे अमरीश पटेल 332 मते घेऊन विजयी

शेअर करा

भाजपचे अमरीश पटेल 332 मते घेऊन विजयी

ऋषीकेश अहिरराव
धुळे दि 3 डिसेंबर ,

धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मतं घेत एकतर्फी विजय मिळवला आहे. ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ४ मतं बाद झाली, तर ३३२ मतं अमरीश पटेल यांना मिळाली आहेत. कॉग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना फक्त 98 मतं मिळाली. विशेष म्हणजे संख्याबळाचा विचार करता ही निवडणूक तुल्यबळ ठरली असती , मात्र महाविकास आघाडीने भाजपसमोर सपशल शरण पत्करल्याचे चित्र निवडणुकीत दिसून आले.
आघाडीच्या उमेदवाराला संख्याबळ असूनही मतांची तीन आकडी संख्या गाठता आली नाही, यावरून किती मोठ्या प्रमाणात आघाडीची मतं भाजपाकडे वळली हे स्पष्ट होते.

अमरीश

 

हेही वाचा:वन विभागाच्या मदतीला पुण्याच्या रायफल क्लबची टीम

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close