ताज्या घडामोडीमराठवाडा

*केजमध्ये महिला व बालकल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मसूरदाळ व चवळीच्या पॉकेट मधून हरभऱ्याचे वाटप !*

शेअर करा

 

केज दि.१७ टीमसीएम न्यूज

केज तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत दरमहा गरोदर माता व बालकांसाठी अंगणवाडी मधून देण्यात येणाऱ्या पोषण आहारात संबंधित गुत्तेदारांनी कडधान्याची अदलाबदली करुन वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पिशवीत मसूरदाळ व चवळीच्या ऐवजी हरभऱ्याचे वाटप केल्याने पोषण आहार योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला आहे. या पोषण आहारात भ्रष्टाचार व मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून याची चौकशी करण्याची मागणी सुमंत धस यांनी केली आहे.
.केज तालुक्यातील अंगणवाडीतून गरोदर माता व तीन वर्षापर्यंतच्या बालकांना दरमहा गहू २ किलोमुगडाळ,चवळी,मटकी,मसूरदाळ
,खाद्यतेल, तिखट,हळद,मीठ आदीचे वाटप करण्यात येते .केज तालुक्यात दोन दिवसापूर्वी नंदुरघाट,सांगवी सारणी,हंगेवाडी,केळगाव आदींसह तालुक्यातील अंगणवाडीतुन वाटण्यात आलेल्या पोषण आहारामध्ये चवळी व मसूरडाळीच्या पॉलिथिनच्या पॅकबंद पॉकेट मधून मसूरदाळ  व चवळीच्या ऐवजी त्या पॉलिथिनच्या पॉकेट मध्ये हरभरा भरून त्याचे मसूरदाळ व चवळीच्या नावाखाली वाटप करण्यात आले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.राज्यशासन गरोदर माता व बालकांमध्ये कुपोषितपणा येऊ नये म्हणून अंगणवाडीच्या माध्यमातून चवळी मसूरदाळ,मटकी,मुगडाळ,हरभरा आदी जीवनसत्व असलेल्या कडधान्याचे वाटप करण्यात येते.असे असतानांही चवळी व मसूरडाळीच्या पॉलिथिनच्या पॉकेटमध्ये चक्क हरभरा निघाल्याने महिला व बालकल्याण विभागाने पोषण आहाराच्या वाटपामध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केला असून पोषण आहारात देण्यात येणाऱ्या कडधान्य बदलाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी धस यांनी केली आहे.

याा बाबत केजच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे यांच्याशी संपर्क साधला असता गुत्तेदारांनी फेडरेशनची परवानगी घेतली असल्याचे सांगितले.व,मसूरदाळ व चवळी ऐवजी हरबरा वाटप केला आहे.तर गुत्तेदार म्हणतात की,फक्त पिशव्या न मिळाल्याने चवळी व मसूरदाळीच्या पिशवीत हरबराचे वाटप केले आहे.मग नेमके पिशव्या मुळे हरबरा वाटला की,चवळी,व.मसूरदाळीचे भाव ७०त ९० रुपये किलो प्रमाणे आहेत.तर हरबरा फक्त ३० ते ४० रुपये किलो आहे. मग या कडधान्याची अदलाबदली नेमकी कशामुळे करण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी सुमंत धस यांनी केली आहे.

परवानगी घेतली आहे  – शोभा लटपटे

केज तालुक्यात चवळी व मसूरडाळी वाटपाऐवजी हरभरा वाटप करण्यात आले आहे.सध्या लाँकडाऊन असल्याने पॉलिथिन पॉकेट संपल्याने मसूरदाळ व चवळीचे पॉकेट मधून हरभरा वाटप करण्यात आले असल्याचे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे यांनी सांगितले. दरम्यान गुत्तेदार ज्ञानदेव तांदळे यांनी सांगितले की, लाँकडाऊन असल्याने व पिशव्या नसल्याने चवळी व मसूरदाळीच्या पिशवीतून हरबरा वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close