ताज्या घडामोडीमराठवाडा

*आष्टी शहरातील दत्तमंदिर गल्ली येथे पूर्णवेळ संचारबंदी लागू–जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

आज पूर्ण आष्टी बंद

शेअर करा

 

आष्टी दि. 11 जुलै टीम सीएम न्यूज

आष्टी शहरातील दत्तमंदिर गल्ली येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळुन आल्याने आष्टी येथील दत्तमंदिर गल्ली ते साई मंदिर या भागात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आष्टी शहरातील दत्तमंदिर गल्ली मधील दत्तमंदिर गल्ली ते साई मंदिर पर्यंत या ठिकाणी कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .

 

हेही वाचा *बीड जिल्ह्यात 20 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह;आष्टी शहरातील एकाचा समावेश*

राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close