ताज्या घडामोडीमराठवाडा

*कोरोनाला सहज घेऊ नका!आष्टीत कोरोनाने एका कर्मचाऱ्यांचा मृत्यू*

शेअर करा

 

आष्टी दि 12 ,प्रतिनिधी

आष्टी तालुक्यात आज फक्त सात कोरोना बाधित आढळून आले.त्यामुळे कोरोना संपला असे अजिबात समजू नका.आज कोरोनामुळे आष्टीतील एका कोरोना बाधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.अवघे पस्तिशीच्या वयात कोरोनाने या व्यक्तीला कवेत घेतले.

दिवाळीच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यायला हवी .मात्र कोरोना गायब झाला असे समजत बरेच लोक तोंडावरचा काढून मोकाट फिरत आहेत त्यांनी या गोष्टी गांभीर्याने घ्यायला हवं.
आष्टी उपनगरात राहणाऱ्या अवघ्या 35 वयाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.काल दिवसभर कोरोना योध्याची ड्युटी करून घरी गेल्यानंतर त्यांना त्रास झाला .सकाळी दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये ते बाधित असल्याचे आढळून आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले .त्यानंतर तात्काळ त्यांचा मृत्यू झाला.

या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर आता या संपूर्ण विभागाची कोरोना टेस्ट करणे गरजेचे आहे.त्यातून अनेक बधितांचा शोध घेण्यास मदत होणार आहे.
मला काय होत ही भावना सध्या सगळीकडे बळावताना दिसत आहे.नागरिक कोणतीही काळजी न घेता वावरताना दिसत आहेत.दिवाळीनंतर पुन्हा दुसऱ्या कोरोना लाटेची शक्यता नाकारता येत नाही .असेच सुप्त कोरोना बाधित होऊन एकदाच त्याचा उद्रेक होण्याची शक्यताही आहे .त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
बीड जिल्ह्यात आज 76 कोरोना बाधित आढळून आले.त्यामध्ये सर्वाधिक हे बीड मधील असून त्याखालोखाल केज आष्टी असा क्रमांक लागत आहे.

हेही वाचा:*वाघ देवतेच्या प्रतिस्थापणेने वाघबारस साजरी

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close